मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा दिवाळी गोड होईल असे म्हटले जात आहे, याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. ही भेट दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँकेतील खात्यांमध्ये जमा होणार आहे. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
