Headlines

Health Tips : टाईप – 2 मधुमेहावर नियंत्रणासाठी काय करता येईल ? आहारातले बदल पुरेसे असतात का ?

मुंबई : उन्हाळ्यामुळे तहान लागणं वेगळं पण अलीकडच्या काळात जास्त तहान लागणं, ऊर्जेची पातळी कमी होणं, भूक वाढणं आणि सतत डोकेदुखी यांसारखी लक्षणं जाणवत असतील, तर इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याची शक्यता असू शकते.

इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर आहारातील साखर मोठ्या प्रमाणात कमी करणं किंवा ती पूर्णपणे बंद करणं, तसंच तेलाचा वापर कमी करणं आणि वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं महत्त्वाचं असू शकतं. मधुमेह नियंत्रण करायचं म्हणजे इतके उपाय नाही तर आणखी काही काळजी घेणं गरजेचं आहे.

दिनचर्या आणि बैठी जीवनशैली यांच्यात मधुमेहाचं व्यवस्थापन करणं मोठं आव्हान असतं. वेळेवर जेवण न करणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव तसचं संतुलित आहार न घेणं ही इन्सुलिन रेझिस्टन्सची मुख्य कारणं आहेत आणि यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *